जमिनीवरचे पाय......
तुमच्याकडे एखादी चांगली वांगली घटना घडली की, तुम्ही दिवसभर त्यात अडकलेले असता. नंतर मात्र सगळा गोतावळा जातो आणि तुम्ही एकटे उरता. तुम्ही पुरते कंटाळून आणि थकून गेलेले असता. तेव्हा उशीरा रात्री तुमच्याकडे येणारा, तुमचा थकवा घालवण्यासाठी तुम्हाला बाहेर घेवून जाणारा एखादा कौटुंबिक मित्र किंवा नातेवाईक असतो. कधी एकटा, कधी जोडीने ही मंडळी हमखास येणार, लॉंगड्राईव्हला घेवून जाणार आणि आपल्यालाच बोलायला लावणार. बाहेरच कुठे तरी मग उशीरापर्यंत जेवणखाण, गप्पा आणि मग रिलॅक्स झाल्यावर ते घरी आणून सोडणार. ते स्वत: मात्र दिवसभर कुठल्या कामात होते, किती बिझी होते याबद्दल शब्दही नसतो. थकल्याची एक खूण दिसत नाही आणि आपलं ऐकण्यातला उत्साह तसूभरही कमी नसतो. नंतर आपल्याला कळतं की, ते दिवसभर कुठल्यातरी प्रवासात होते किंवा कंपनीच्या कुठल्यातरी हेक्टीक बैठकीत गुंतून होते. आपण एरवी बाहेर आपल्याविषयी कितीही मौन बाळगून असलो तरी आपल्याला एखादं ठिकाण असं हवं असतं की, तिथं मोकळेपणाने मत मांडता येईल, चेष्टामस्करी करता येईल आणि प्रसंगी फुशारक्याही मारता येतील. खरं तर बोटावर मोजण्यासारखी अशी एकदोन घरं असतात. बाहेर काही ...