पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पालकप्राचार्य बोराडेसर!

शाळेत असतानाची गोष्ट. मोठ्या बहिणीने माझं मराठीचं पुस्तक पाहिलं आणि म्हणाली, हे सर तर आमचे प्राचार्य आहेत. मी म्हटलं, तू पाहिलं आहेस का यांना? ती म्हणाली, रोजच पाहते.
आपल्याला धडा असलेला लेखक बहिणीला …

एष्टीतले अंकल

बस निघालीये. फार रिकामी नाही, फार गर्दी नाही. सोय बघून कुठेमुठे प्रवासी बसलेले. मधल्या थांब्यावर एक मम्मी तिच्या पिल्लूला घेवून चढते. एक लंबुळकं रिकामं शीट त्यांचीच वाट पाहतंय. मम्मीचं पिल्लू भलतंच ब…

साडीचा आग्रह

पहाटेची वेळ. रस्त्यालगतच्या बाकड्यावर बसलोय. पलिकडच्या बाकड्यावर एक महाशय माझ्यासारखेच एकटे बसलेत; पण अस्वस्थ असे. काही वेळ जातो. समोरून एक बाई येतात. बसतात. बहुधा जोडपं असणार. महाशय टम्म, बाई साधारण…

सुन्न पहाट

पहाटे भरधाव वेगात वाहणा-या कंपन्यांच्या गाड्या. त्यांचा छाती दडपणारा आवाज अगदी शेजारून स्पर्शून जातो. त्या आवाजाला लटकून मग आपणही दूरवर फरफटत जातो. पुढच्या प्रत्येक पावलागणिक त्यांच्या कंपन्यांतली धड…

ऑडी ची गोष्ट

जुनी गोष्टै. शहरात निरनिराळ्या चारचाकी गाड्यांचं प्रदर्शन होतं. पेपरमधून त्याचा भरपूर प्रचार झाला होता. कुठल्या कुठल्या भारी गाड्यांचे फोटो छापून आले होते. गर्दी भरपूर होती. चिरंजीवही गेले होते. पाचव…

कृपया आहेर आणू नये....

‘कृपया भेटवस्तू, पुष्पगुच्छ वगैरे आणू नये’ अशा आशयाची एक ओळ अलिकडे बहुतांशी लग्नपत्रिकांच्या तळाशी अंग आखडून बसलेली असते. आपल्याकडे बघून ती छद्मी हसत असल्याचा भास आपल्याला होत असतो. भले मग ती लिहिणार…

स्मशानातील खदखद

स्मशानात अंत्यविधीची तयारी चालू होती. ब-यापैकी लोक जमा होते. अजस्त्र लिंबाखालच्या बाकड्यावर दोन वृद्ध एकमेकांना खेटून बसले होते. एरवी अशा वेळी त्यांच्यासोबत, त्या बाकड्यावर बसणारा तिसरा दोस्तयार आज स…

खरंय तुमचं.....

पाव्हणे आले होते. गप्पांचा फड जमला. ते म्हणाले, मोदी येईल असं वाटतं काय पुढच्या वेळी? मला नाही वाटत येईल म्हणून. लोकांना बरेच निर्णय आवडले नाहीत. मी म्हटलं, खरंय तुमचं! फार ओरड चालूये. त्यांच्यासोबत आल…

मॉलमधलं जोडपं

मॉल. एक तरणं जोडपं. त्यांच्यासोबत एक गोरं गोमटं गोंडस बाळ. तीन तासात किमान चारदा तरी आम्ही निरनिराळ्या दुकानात योगायोगाने भेटलो. त्यांचं आपसातलं संभाषण अगदी हलक्या आवाजातलं. त्यांना स्वत:ला तरी काही …

परतीच्या वाटेवरचे आजोबा-आज्जी

सकाळी फिरायला गेल्यावर परतीच्या टप्प्यात मंदिराच्या थोडं मागेपुढे मला एक आजोबा आज्जी दिसायचे. आजोबा किंचितसे वाकलेले होते, आजी ताठ होत्या. आमच्या चौथ्या भेटीच्या वेळी मग आजोबांनी आणि मी एकमेकांना ओळख…

देवघरातल्या पाली

एरवी माझ्याकडचे देव वर्षभर नास्तिक असतात; पण सणावाराच्या काळात मात्र त्यांना पूजावंच लागतं. कुठल्या ना कुठल्या कारणाने ती जबाबदारी नाईलाजाने माझ्यावर येतेच येते. मग मला भयंकर टेन्शन येतं. अंगावर काटा…

उर्वरित रंगकाम आणि सुटलेली पोटं!

माणसाला एकवेळ रंगसंगती कळत नसेल तर चालतं; पण रंगाचं प्रमाण मात्र कळालं पाहिजे. बैठकीतल्या दिवाणचे दोन पाय रंग उडून कोड फुटल्यागत दिसू लागले म्हणून मध्यंतरी ऑईलपेंट आणला. ते दोन्ही पाय रंगवून काढले. न…

बघ, तिची आठवण आली...

वडिल म्हणाले, जरा सोफ्याचे कुशन बदलून घे. अनेशा चार माणसं येताहेत तुझ्याकडे. त्यांना नीट बसता आलं पाहिजे. तुझ्या सोफ्यात बसायचं म्हटलं की, माणूस आत धसून जातो. त्याच्या आजूबाजूला कोणी बसलं तर मग बघायल…

सुधा राणा

आपल्या लेखनावर भरभरून प्रेम करणारा कुणी गेला की, लिहिणारा माणूस आतून उन्मळून पडतो. अस्वस्थ व्हायला होतं. सुधा राणा यांची माझी कधी भेटगाठ नाही पण त्या गेल्याचं कळालं आणि तसं झालं.
पद्मगंधा दिवाळी अंकात…

हरवलेला गणपती आणि कात्री.....

काल मोग-याचं निवासस्थान मोडाव लागलं. तो एक जुना पत्र्याचा डबा होता. त्यात काही वर्षापूर्वी या वेलीमोग-याचं छोटंसं रोप लावलं होतं. ते चांगलंच बहरलं होतं. उंच गेलं होतं. यंदा बहार संपल्यावर जराशी छाटणी…

गोगलगाय, पोटात पाय!

यंदाच्या पावसाळ्यात बागेत गोगलगायीचं प्रमाण फारच वाढलं. बघावं तिथं गोगलगायी. अगदीच पहिल्यांदा तिला बागेत पाहिलं, तेव्हा फार आनंद झाला होता. बालपणाचीच आठवण दाटून आली होती. मग दोन पायावर बसून तिच्या मा…

सडा आणि फुले!

सिझनमध्ये वेलींना एवढी फुले येतात की, त्यांचा सतत सडा पडत राहतो. सणावाराला भाविक मंडळी नेतात भरपूर; पण नंतर नुसतेच कौतुक उरते. एकदिवस नाही आवरलं की, त्या फुलांचा अक्षरश: चिखल साचत जातो. मला असं वाटाय…

दौडा दौडा दौडा घोडा, दारू उठा के दौडा!

भाच्चा म्हणाला, मामा, दारू सोडायचीये का?
मी दचकून बघितलं. त्याच्या प्रश्नात खोट नव्हती; पण टोनमध्ये मात्र होती. पठ्ठ्या विचारतोय, सोडायचीये का म्हणून आणि त्याचा टोन मात्र असा की, जणू ऑफर देतोय, थोडी थो…