पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आमटी, शब्दासाठी

बहिणीच्या शेतातून दरवर्षीप्रमाणे तुरीच्या शेंगा आल्या. मग अर्थातच, आमटीची फर्माईश केली. घरचे म्हणाले, ठिकै; करू आमटी; पण त्यासाठी तुम्ही आधी त्या शेंगा सोलून अर्ध बोबडं करून द्या. ....... आमटी आणि तिची…

एक गोष्ट अपूर्ण....

शाळेतून आल्यावर स्वैपाक करून ती दवाखान्याच्या दिशेने निघाली. पाठीवर तीनेक वर्षांचं मूल बांधलेलं. दवाखान्यात पोचली तेव्हा बहिण झोपलेली. अशक्तपणामुळे ग्लानी आलेली. पुढ्यातल्या पाळण्यात छोटं बाळ. तिने प…

काली मांजर आणि अपराधगंड

सकाळी दार उघडल्या उघडल्या या बाईसाहेब अशी नजर रोखून बघत असतात. आधीच तो कलात्मक रंग, त्यात ते हिरवे डोळे. व्हरांड्यातली ही बैठक त्यांच्या रात्रीच्या मुक्कामाची झालीये. पूर्वी दार उघडताच त्या लगेच उठून…

गुणगुणण्यातले धागेदोरे!

मध्यंतरी मित्राबरोबर बाहेर गावी गेलो होतो. त्याचं काही तरी काम होतं, एका ऑफिसात.
तर त्या साहेबांसमोर आम्ही बसलो होतो. ते मध्येच फोनवर बोलत होते, नंतर गुणगुणत होते. मग पुन्हा आमच्याशी बोलत होते. गृहस्थ…

वाघाचं कातडं पांघरल्याची गोष्ट...

घरासमोरच्या आडातून बादलीभर पाणी शेंदलं आणि आता वाड्यात शिरणार तोच, तिथं वानरांची भलीमोठी टोळी बसलेली. पोटाशी लेकरं घेतलेल्या भारदस्त म्हाळणी, लहान मोठे खोडकर पोरं आणि कदाचित टोळीप्रमुख म्हाळ्याही असा…

गांव, लगबग, प्रश्न

उन्हं कलू लागलीत. चौकातल्या बांधकामाचा धुराळा खाली बसतोय, मलब्याची शेवटची ट्रीप निघालीये. बाया अंगण झाडताहेत, अंगण रस्ताये. आख्खा रस्ताच झाडून निघतोय, पाणी शिंपडलं जातंय. आजूबाजूच्या दुकानात अगरबत्त्…

शिल्लक पिठांची रेसिपी

बऱ्याच दिवसांपासून श्रीखंड वगैरेंचे इतकुले डबे अडवून ठेवलेल्या निरनिराळ्या पिठांची जेव्हा वासलात लावायची असते तेव्हा खऱ्या अर्थाने काहीतरी चमचमीत खायला मिळण्याची शक्यता असते.
या उर्वरित पिठांचं प्रमाण…

प्रेमातली भजुडी

फक्त प्रेमातल्या माणसालाच लाडिक हाक मारावी असा काही नियम नाहिये. आवडत्या पदार्थालाही अशी प्रेमळ हाक दिली जावू शकते. एका घोळक्यातली कन्यका परवा गरमागरम भजांची प्लेट बघून, 'वॉव, माझी भजुडी गं!' असं…

बाजरीची भाकरी आणि ...

अष्टगंधाचा टिळा लावून आपल्यासमोर नैवेद्याचे ताट ठेवले जाते. आपली नजर टपकन बाजरीचा रोट आणि वांग्याच्या भाजीवर जाते. भरीतही खुणावत असतंच शिवाय हादग्याच्या फुलांचे भजे बोनस म्हणून असतात.
आपला हात सरसावले…

बातम्या, टिकटॉक आणि घरेलु उपचार

खरं तर युट्यूबवर बातम्या बघत होतो, आपोआपच टीकटॉक लागलं. ते बातम्यांपेक्षा भारी वाटलं. त्यात बराच वेळ रमून गेल्यावर अचानकच कुठलीतरी कळ दाबली गेली आणि पाच मिनीटात दाढदुखी थांबवा, मधुमेह कायमचा बरा करा,…

न्यूनगंड

बुटंफिटं वगैरे जामानिमा करून आपण सिमेंटच्या रस्त्यावरनं फिरायला निघालेलो असतो. समोरून एक भल्या मोठ्या ढेरीचा माणूस येताना दिसतो. तो चालत असतो, ती डुलत असते. आपण मग आपल्या पोटाकडे पाहतो. असतं; पण तेवढ…

ऊर्जेच्या गोष्टीचा उत्तरार्ध...

आठवणीचा महावृक्ष उन्मळून पडला की पाखरं सैरभैर होतात, ताईमावशी गेली, तेव्हा हेच झालं. ‘सेव्हन सिस्टर्स’पैकी तीन पानं आधीच गळून पडलेली. ताई सगळ्यात मोठी. तिच्या फांद्या दूरवर पसरलेल्या. आईची आणि तिची भ…

कोकिळेची दादागिरी आणि आणि तांबटची गँग!

माझ्या मनात आता कोकिळेची इमेज पूर्वीसारखी राहिलेली नाही. उलटपक्षी जरा फसल्याचीच भावना आहे. परवाचं तिचं वर्तन मला खटकलं. कोकिळेचा अप्पलपोटी स्वभाव कळाला तर ‘गानकोकिळा’ वगैरे शब्द कुणी वापरणारही नाही. त…

ऊर्जेची गोष्ट....

आजोबांना सात मुली आणि दोन मुलं अशी नऊ अपत्य. सगळ्यात मोठ्या मुलीत आणि छोट्या मुलीत तब्बल पंचवीस वर्षांहून अधिक अंतर. आई आणि मुलगी एकाच वेळी बाळंत होण्याचा तो काळ. या सगळ्या भावंडांची मिळून ३३ अपत्य. …

ऋणपर्यटन

म्हातारपण गावाला पक्कं चिकटून बसलेलं; पण एरवी सणावाराला आवर्जून शहरात येणारं. ते म्हणाले, दगदग सहन नाही होत. रस्तेही धड नाहीत. यंदा इथंच निवांत बरं, नंतर येवूत, कदाचित नवरात्रानंतर. त्यांच्याशिवायचा स…

प्रत्येकाने भ्यालंच पाहिजे.....

... रेडिओवर ‘थँक्यू मिस्टर ग्लॅड’ चालू होतं. मध्येच खरखर आवाज यायचा. रात्रीची शांतता, सभोवती अंधार. आम्ही सतरंज्या टाकून दाटीवाटीने टेकून बसलेलो. चाकांचाच तेवढा आवाज चालू. रस्ता ओबडधोबड. बैलगाडी धिमे…

सातभाईंचं संयुक्त कुटुंब

सातभाई पक्षी मला कायम संयुक्त कुटुंबाचे प्रतिक वाटतात. माझ्याकडे त्यांची कायम उठबस असते. आळे खांदून वगैरे ठेवलेले असले की, त्यादिवशी त्यांची हमखास हजेरी असते. बस्स, ते माझ्याकडचे गांडुळ गट्टम करतात ए…