बघ, आता सकाळीच चिमण्यांचं सुरू होईल. नंतर गधडे, त्यांना कळवाच नाही, मग शेळ््या, त्यांना राखोळ््या नाही. मग वानरांचं, त्यांना तर कुणाचा धाकच नाही. पत्र्यावर नुसता दांगोडा सुरू होईल...आम्मा सांगत असतात…
फाट्यावर उतरून पायपीट करत गावात पोहोचलो. पंचक्रोशीतलं ते नावाजलेलं घराणं. भलं मोठं कुटूंब. भरपूर जमीन, घरात जेवढे सदस्य तेवढेच नोकरचाकर. भला मोठा तीन ताळी वाडा. दर्शनी भागात वरच्या दोन मजल्यांचा सज्ज…