पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मोठं घर... आणि आठवणींंचा केसर!

... तर मोठ्या घरून केसरची पेटी आली. ती येतंच असते दरवर्षी न चुकता. मोठं घर, अलिकडच्या काळात हे घर टोलेजंग झालेलं असलं तरी ते जेव्हा दोन अडिच खोल्यांचं होतं तेव्हाही ते मोठं घर म्हणूनच मानलं जायचं. तो …

न दाखवायचे फोटो

आपल्या अल्बममध्ये काही फोटो असे असतात की, ते आपल्याला कुणाला दाखवावे वाटत नाहीत; पण जुने असल्याने आणि त्या काळची आठवण म्हणून आपल्याला ते फेकवतही नाहीत. मग ‘ओन्ली मी’ च्या नावाखाली ते ड्राव्हरच्या खाल…

रग कुस्त्यांची

गावाकडं यात्रेत कुस्त्यांच्या स्पर्धा व्हायच्या. नदी ओलांडली की पलिकडे मोठी आमराई होती. तिथल्या सावलीत, काळ्या मातीत हा फड रंगत. पंचक्रोशीतले पहिलवान येत. गावातलेही रामदास पहिलवान आणि संतोष पहिलवान अ…

सिगारेट आणि ...

भरारा वा-यात सिगारेट पेटवणा-यांबद्दल मला फार पूर्वीपासून कौतुकै. पंखा चालू असताना साधी उदबत्ती पेटवता येत नाही आपल्याला आणि ही मंडळी मात्र भररस्त्यात, भणाण वा-यात सिगारेट पेटवतात हे कमालीचं वाटतं मला…

तेरे संग ....

आपण होस्टेलवर राहात असतो किंवा मग कंपनीच्या गेस्टहाऊसवर. एकेदिवशी आपल्याला सांगितलं जातं, अजून एकजण येणारै काही दिवस राहायला, तुम्हाला त्याच्यासोबत रुम शेअर करावी लागेल. काम संपलं की तो जाईल. आपणही म…

पत्र्याची खोली

पाऊस कोसळायला लागला की पत्र्याच्या घरात जावून राहावसं वाटतं. पत्र्यावर पावसाचं लयबद्ध नृत्य चालू असतं. खाली आपल्याला त्याच्या चढउताराशिवाय काहीही ऐकू येत नसतं. त्याच्याच तालात ताल मिसळून आपल्याला डुल…

गुलमोहराचं जाणं....

कॉलनीतली आमची घरं जुनी. नंतर समोर अपार्टमेंट वाढत गेले. एका अपार्टमेंटला तिन्ही बाजूंनी मस्त झाडं लावली होती. त्यातला गुलमोहर माझ्या कंपाऊंडसमोर होता. त्याच्या खोडाचा घेर खूप मोठा होता. त्याची सावली …

वानर आणि ओटा

उन्हाळ्यात गावाकडं बहुतेकांच्या खाटा दारापुढे रस्त्यावर उतरायच्या. आजूबाजूला शेतं होती. ब-याच शेतात ऊस असायचा. त्यामुळं मस्त गार वा-याची झुळूक यायची. गप्पाटप्पांत आणि चांदण्या मोजण्यात झोप लागून जायच…

रस्त्यातलं घर

एखाद्या प्लास्टर उडालेल्या कंपाऊंडवॉलवर खापराचं टेकण देवून कशीबशी तगून ठेवलेली; पण रोप तरारून आलेली मातीची कुंडी मला भावते. तिच्यात निराळाच जिव्हाळा असतो. अशा कुंडीत बहुतांशी तुळस असते किंवा मग कोरफड…

लसूण लालमिर्ची वगैरे....

...तर ही पाट्यावरची लसूण-लालमिर्ची चटणी, ताक शिंपडून. नंतर वरनं फोडणीही घातलीये...
पहिल्या घासाला पाणी मागतो माणूस. जीभ आगआग, तोंड भाजून निघाल्यासारखं वाटतं. हाशहुशचे आवर्तनं होत राहतात. खरं तर उत्साह…

झाडं सांगतात माणसाची गोष्ट....

तुम्ही खूप कुणाकुणाकडून रोपं आणलेली असतात, कुणी खास तुमच्यासाठी म्हणून दिलेली असतात. त्या रोपांसाठी तुम्ही घरातली योग्य जागा किंवा कुंडी निवडता. त्यांची देखभाल करता. ती रुजली की प्रचंड खुश होता.
तुम्ह…

गाण्यात अडकतो जीव...

गावाकडे गेलं की, दोन दिवस गप्पाटप्पा होतात. इकडची तिकडची ख्यालीखुशाली होते. दोन दिवसानंतर वडिल त्यांच्या नाट्यगीतात रमून जातात. आपणही ऐकतो थोडं त्यांच्यासोबत. मानही डोलावतो. एरवी ‘वद जावू कुणाला शरण.…