झाडांचे शौक


बागेतल्या नव्या रोपट्याला पिठ्या ढेकूण लागला तर एकजण म्हणाला, ‘झाडावर तंबाखूचं पाणी फवारा!’
क्यान्सरच्या धसक्याने आपण किती लपूनछपून खातो तंबाखू आणि हे झाडंफिडं मात्र खुशाल जर्दा लावून निरोगी डुलायला लागतात. हे तर समजून उमजून माणसांना खिजवण्याचंच काम म्हणायचं!
त्याहीपूर्वी आधी कोणीतरी केव्हातरी पीकावर देशी दारू फवारायची भन्नाट आयडिया काढली होती. पेस्टीसाईडपेक्षा ठर्रा केव्हाही बराच म्हणून त्याचा बोलबालाही भरपूर झाला होता.
या झाडाझुडपांनी माणसांचे सगळे शौक मातीत घालायचा विडा उचललाये का काय? जर्दा आणि ठर्रा ह्यांनाच लागणार असेल तर आम्ही माणसांनी लिंबोळी आर्काचा पेग मारून शेणखतात लोळावं का काय?

टिप्पण्या