नंतर आलेले लोक, त्याहीनंतर आलेले लोक


आपल्या आठवणी हळूहळू ब्लॅक अँड व्हाईट रुप घेवू लागल्या की, नंतरच्या पिढ्यांचा एकत्रित फोटो अनोखे रंग भरतो आपल्यात!

अजुनही पेपरात, मासिकात संयुक्त कुटुंबाच्या स्टोऱ्या, त्यांचे फोटो येत असतात. त्यात तीन चार पिढ्यांची चांगली शंभरावर वगैरे सदस्यांची फौज असते. त्यांचं भारी कौतूक वाटतं; पण ते चित्र फारच दुर्मिळ असतं.

अगदी तेवढ्या प्रमाणात नसला तरी सर्वसामान्य
परिवारातही स्वबळावर असा गर्दा असायचा. तो कमी कमी होत गेला. आता चुलत, मावस, आत्ये, मामे असे घटक भावंडं जमा होतात तेव्हा कुठे असा दणकेबाज फोटो निघतो.

ही मंडळी दोनेक दिवसांसाठी जमा होते आणि भुर्रकन जिकडे तिकडे उडून जाते. प्रत्येकाचं एक स्वतंत्र आयुष्य असतं आणि आपलं आयुष्य त्यातल्या प्रत्येकाच्या जगण्याला धरून असतं. पुन्हा भेटुयात म्हणून ही मंडळी पांगली की काही काळ आपण एकटेच उरतो फ्रेममध्ये!
....

भारी आवडलेला फोटोये हा आपल्याला. फोटोत मागच्या रांगेत जी स्पेस राखीव दिसतेय, तिथे आता नवा सदस्य जावई माणूस आलाय.

टिप्पण्या