सुट्टीचा उन्माद
एक नावाजलेला खाजगी क्लास. क्लासच्या दारात पोरांची गर्दी. पहिल्या क्लासचे पोरं अजून रेंगाळून आहेत, दुस-याचे येत आहेत. आज दोन्हीचा क्लास एकत्रच आहे काय? पोरं संभ्रमात. तेवढ्यात शिपाई येतो. सांगतो, आज क्लास होणार नाही आणि उद्याही क्लासला सुटी. सर तातडीने बाहेरगावी चाललेत.
बहुसंख्य पोरं खुशीत; पण खुशीला काही तरी कारण पाहिजे असतं. मग एक बांड पोर काढतंच माग. का नाही होणार क्लास? उद्या कशासाठी सुट्टी?
तर काय, सरांची बहीण अचानक गेल्याचा निरोप असतो. तसा नुकताच फोन आलेला असतो. माहिती घेवून पोरगं बाहेर जातं आणि उत्साहात सांगतं, ‘अरे, सर आणखी दोनचार दिवस नाहीयेत आता, सरांची बहिण गेलीये, क्लासला सुटटी! चलो पिक्चरला!’ नंतरचं वाक्य कुणाला ऐकू जातं, कुणी पहिल्याचं वाक्यात अडकून राहतं आणि हुय्योचा एकच गोंधळ उडतो.
....
सरांनी हे ऐकलेलं असतं; पण सर गप्प असतात. त्या क्षणी कसं रिअॅक्ट होणार? पोरांना शिव्या घालणार की त्यांच्या पालकांना? की काळ- समाज- कुटुंब व्यवस्था यांना आरोपीच्या पिंज-यात उभे करणार?
तूर्त, बहीण आणि बहिणीसोबतचे असंख्य चांगले वाईट क्षण सरांच्या डोळ्यापुढे उभे असतात!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा