ऑर्डर देणारा माणूस .........!

काही लोकांना नेमकं हॉटेलात आल्या आल्या वॉशरुममध्ये जाण्याची भली खोड असते. त्यातल्या त्यात आपल्याला हॉटेलात नेणारानेच असं केलं तर फारच अवघड होवून बसतं. वेटर छातीवरच बसून असतो. ऑर्डर सांगा म्हणून....
तथाकथित सभ्य शहरातली गोष्ट. असाच प्रसंग. आला वेटर. म्हटलं, जरा थांबा, मित्र येतोय. मग सांगतो. मित्राला थोडा उशीर झाला. दरम्यान, तीन वेळेस वेटर छातीवर बसून गेला.
चौथ्या वेळेस आला तेव्हा त्याला कान जवळ आणायला सांगितलं आणि शब्दांची तमा न बाळगता म्हणालो, ‘दादा, ऑर्डर देणारा माणूस मुतायला गेलाय. तिकडंही एक चक्कर टाकून बघा ना...रांगेत असेल तर सांगेल तोही.’
वेटर चमकून बघू लागला. तसं पुन्हा म्हटलं, ‘सहज ओळखू येईल तुम्हाला तो. त्याच्या अंगावर खादीचा झब्बा, जिन्सची पँट आणि डोळ्यावर चष्माये बघा....’
.....
वरताण म्हणजे, बरं म्हणून पठ्ठ्या गेला ना खरंच तिकडं...
च्यायला, लोकाना उपरोधही कळत नाही राव आजकाल!

टिप्पण्या