प्रेमातली भजुडी


फक्त प्रेमातल्या माणसालाच लाडिक हाक मारावी असा काही नियम नाहिये. आवडत्या पदार्थालाही अशी प्रेमळ हाक दिली जावू शकते.
एका घोळक्यातली कन्यका परवा
गरमागरम भजांची प्लेट बघून,
'वॉव, माझी भजुडी गं!'
असं उत्स्फूर्ततेने म्हणताना ऐकलंय मी
चौकातल्या भज्याच्या गाडीवर!
त्यांच्या घरी नक्कीच भाज्यांनाही
कांदुली, मुळ्ळू, वांगुडा, मेथुडी, गवराबाय म्हणत असणार. नॉनव्हेजवाले असतील तर अंडूमटनूचिकनू!
भलतंच भारी आहे हे. जबरा आवडलंय. दाटून आलंय.
म्हणून पाहणारै एकदा, घरच्या घरी, कशाला तरी!
(फोटो नेटवरनं हाणलाय, तेवढ्यासाठी कुठं भजे करा.)

टिप्पण्या