आमटी, शब्दासाठी

बहिणीच्या शेतातून दरवर्षीप्रमाणे तुरीच्या शेंगा आल्या. मग अर्थातच, आमटीची फर्माईश केली.
घरचे म्हणाले, ठिकै; करू आमटी; पण त्यासाठी तुम्ही आधी त्या शेंगा सोलून अर्ध बोबडं करून द्या.
.......
आमटी आणि तिची चव हा मूळ विषय नाहीयेय अध्यक्ष महोदय. आमटी आवडण्यामागचं, त्याच्या प्रोसेसमध्ये सहभागी होण्यामागचं खरं कारण 'अर्ध बोबडं' हा शब्द आहे. वर्षभरात फक्त याच दिवसात तो शब्द आमच्याकडं उच्चारला जातो. हा शब्द कुठून आला माहित नाही, कुठल्या कुठल्या भागात वापरला जातो माहित नाही. आवडतो मात्र भारी. त्याच्यात भलताच जिवंतपणा जाणवतो.
'अर्ध बोबडं' करण्यापूर्वी कोवळ्या दाण्यांना तळहातावर घेवून त्यांच्याकडं जरा मिश्किल नजरेने बघावं, चवीत फरक पडतो म्हणतात.
बाजारात तुरी, शब्द चवीला भारी!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा