मांडव घातला दारी

सगळ्या वेलांत मधुमालतीवर आपला जास्त जीवै. तब्बल पंचवीसेक वर्षांपासून माझ्यापाशी नांदते आहे ती.
दर्शनी भागात अंगच्याच पुष्पगुच्छांसह ती आलेल्यांच्या स्वागतासाठी हसतखेळत उभी असते. पाहुण्याचा पाय मग काही क्षण तिथेच रेंगाळतो.
तिच्या प्रेमापोटी सलग तिस-या वर्षी जुना मांडव उकलून पुन्हा बांधलाये. घरचेच खोड आणि घरचाच बांबू. आधीच्या अनुभवाने यंदा तो जरा आटोपशीर जमला आहे.
....
मांडवासाठी जमिनीत डीळ गाडली की, काही महिन्यांत ती खालून कुजून जायची. मोसमाच्या मध्यावरच डगमगायला लागायची. आता जमिनीत जाणा-या तिच्या भागावर प्लास्टिकचं आवरण घातलंय. फ्लिपकार्टच्या पिशव्या एरवी कुठं उपयोगाला याव्यात!
आपण त्यांना सेवा द्यावी, ते आपल्याला पोस्ट देतात!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा